'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो.
ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते
या शनिवारच्या भागात बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या उपस्थित राहणार असून त्यांच्या
'कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था, अकोले' या संस्थेला मदत म्हणून महाराष्ट्राचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.