जून महिना पावसाशिवाय कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीपासून मात्र पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत राज्यातील विविध भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पुढील ४ ते ५ दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी अधूनमधून जोरदार सरीसह हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.