मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिलाय. म्हणजे राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे-ठाकरे घराण्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चाललेत. आता राज्याच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध शिंदेसेना हा संघर्ष उघड उघड रंगताना दिसतोय. अशातच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं चालल्याचा दावा करत एकनाथ शिंदे गटानं आज राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली