मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर झालीय. पण सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावींच्या परीक्षेचा निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी नामांकित कॉलेजमध्ये विद्यापीठाकडून जागा वाढवून दिल्या जाणार आहेत. आयसीएसई आणि सीबीएसईच्या निकालानंतर या जागा वाढवण्यात येणार आहेत.