मुंबई महापालिका म्हणजे आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महापालिका. जवळपास दीड लाख कर्मचारी मुंबई महापालिकेत कार्यरत आहेत. तर मायानगरी मुंबईची लोकसंख्या दोन कोटीच्या घरात आहे. हीच मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेसाठी जणू सोन्याचं अंड देणारी कोंबडी. त्यामुळेच शिवसेनेचा यात जीव अडकलाय असं उपहासानं म्हटलं तर यात काही वावग ठरणार नाही. मागील २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे .एकनाथ शिंदेंनी राज्यात सत्ता मिळवल्यानंतर आता त्यांचं मिशन मुंबई महापालिका सुरु झालंय. तर दुसरीकडे शरद पवार देखील मिशन मुंबई महापालिकेच्या तयारीला लागलेत. आता सगळ्याचं पक्षांसाठी मुंबई इतकी का महत्वाची आहे ते जाणून घेऊयात-