शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवसेना आणि शिंदे यांच्यात समेट व्हावा यासाठी भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री शिंदे यांनी 'मातोश्री'वर जाऊन चर्चा सुरु करावी अशी अपेक्षा दीपाली सय्यद यांनी व्यक्त केलीय. याशिवाय आदिवासी समाजाचं नेतृत्व द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी जसा पाठिंबा दिला तसा मराठआ समाजाचे नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे यांनाही मिळावा अशी अपेक्षाही दीपाली सय्यद यांनी व्यक्त केलीय.