रायगड जिल्ह्यातल्या खालापूर-पाली रस्त्यापासून तुकसई गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावर पाणी आलंय. अंबा नदीच्या पुलावर पाणी आल्यानं हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. गेले काही दिवस या भागात जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तालुका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.