माहूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे, आज बुधवारी सकाळ पर्यंत तालुक्यात 86.46 मिली मीटर एवढा पाऊस पडला आहे. माहूर तालुक्यातील वानोळा, दिगडी, रुई, हडसणी, केरोळी, शेकापूर, नेर, लिंबायत, वडसा, पडसा, टाकळी, वाईबाजार, मदनापूर, हरडफ, सायफळ, गोकुळ, सिंदखेड आदी नदी काठच्या गावात व शेत शिवाराचे मोठे नुकसान झाले. पैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली आहे. दरम्यान तहसीलदार किशोर यादव पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांनी पाहणी केली असून पुर परिस्थिती मध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या भागात पोलिसांची गस्त सुरू केली आहे. नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन ही पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे