आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरनगरी दुमदुमलीय... चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांचा मेळा भरलाय.... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली.. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांचे सदस्य पूजेसाठी हजर होते.. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी, मुलगा श्रीकांत आणि नातू रुद्रांश या सर्वांची महापूजेवेळी विठ्ठल मंदिरात उपस्थिती होती.