आज आषाढी एकादशी निमित्ताने मुंबईच्या वडाळा इथला विठ्ठल मंदीरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांनी प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळ्यातील मंदिरात दर्शन घेण्यास सुरुवात केली. गेली दोन वर्षे कोरोनामुळं सर्व प्रकारच्या उत्सवांवर निर्बंध होते. मात्र निर्बंध मुक्तीनंतर पुन्हा विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं भक्तांची मांदियाळी दिसतेय.. आज मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकरांच्या हस्ते सकाळची पहिली पूजा संपन्न झाली..