मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे हे देखील उपस्थित होते. यावर्षी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी श्री. मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी सौ. जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला शासकीय पूजेत मानाचे वारकरी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला.