आषाढी एकादशी जवळ येऊ लागलेय तशी वारऱ्यांची पावलं वेगानं पंढरपूरकडे चालायला लागली आहेत... संत ज्ञानोबारायांची पालखी आज भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. तत्पूर्वी आज ठाकूरबुवाची समाधी इथं ज्ञानोबांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण होणार आहे. तर संत ज्ञानोबा आणि संत सोपानदेव यांच्या पालख्यांची भेटही आजच होईल. तिकडे संत तुकोबांची पालखी आज पिराची कुरोली येथे मुक्कामी असणार आहे. तर तुकोबारायांच्या पालखीच्या तोंडले बोंडले मध्ये धावा होणार आहे.