गेल्या दोन दिवसांपासून मुंबई कोकणात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडही आपल्या कवेत घेतलाय... राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालंय. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय.