राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.