राज्यात एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना दुसरीकडे राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे... आणि या दोन दिवसातल्या पावसातच मुंबईकरांची दैना होतेय. मुसळधार पावसामुळे पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम दृतगती मार्ग, आणि इतर महत्वांच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पालिकेच्या निकृष्ट कामं अवघ्या दोन दिवसाच्या पावसात उघडी पडली आहेत.. पण लोकप्रतिनिधींना अद्याप त्याचं सोयर सुतक दिसून येत नाहीये.