गेल्या 24 तासात देशात 14 हजार 506 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.गेल्या 24 तासात कोरोनामुळे देशात 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 99 हजार 602 वर गेली आहे.