कुर्ल्यात एक चार मजली धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. नाईकनगर सोसायटी असं या इमारतीचं नाव असून, काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. या अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन आणि महापालिकेच्या वतीनं करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच नगरविकासमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.