बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर 11 जुलै नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय होणार आहे. दरम्यान आज कोर्टाकडून शिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ प्रतोद सुनील प्रभू आणि केंद्र सरकारलाही नोटीस देण्यात आली आहे. ५ दिवसांमध्ये आपली बाजू मांडणारं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. झिरवळ यांनी बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी आज संध्याकाळ पर्यंत दिली होती ती 12 जुलै पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी ११ जुलैची तारीख दिली आहे.