Special Report : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु झालाय. त्यामुळे सर्वदूर पेरणीची लगबग सुरु असेल. कोणतं बियाणं पेरायचं, कोणतं पिक घ्यायची, असं प्लॅनिंग सुरु असेल. पण, यासगळ्या गडबडीत, राज्यात एकनाथ शिंदेंची बंडखोरी आणि महाविकास आघाडीचं काय होणार? यासंदर्भात सर्वात जास्त चर्चा सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळं आलंय. एकनाथ शिंदेंच्या बंडखोऱीमुळे मविआ सरकारमध्ये असलेल्या सगळ्याच पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरु झालं. बंडखोरी केलेल्या प्रत्येक आमदारांच्या तोंडावर फक्त आणि फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार नको हीच मागणी होती. त्यामुळेच शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी बंडखोरीही झाली. पण, या वादाची ठिणगी नेमकी कुठं पडली..पाहुयात...