आनंद दिघेंचे पुतणे केदाऱ शिंदेही शिवसेना भवनाबाहेर उपस्थित असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले आहेत,” असं केदार दिघे यांनी सांगितलं.
#AnandDighe #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #VidhanParishad #Maharashtra #SharadPawar #HWNews