आज सकाळी मुक्ता टिळक पुण्यामधून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत असून राज्यसभेच्या मतदानाच्या वेळेसही त्या अशाचप्रकारे सकाळी सकाळी मतदानासाठी मुंबईला आल्या होत्या. त्या मतदानासाठी विधानभवनात पोहोचल्या असून भाजपा आमदारांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं.