सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या २०जून पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या आहेत..१४ जूलैपासून आता या परीक्षा सुरू होतील..तसेच सविस्तर उत्तर पद्धतीऐवजी बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेतल्या जातील..आज सकाळपासून परीक्षा पुढे ढकलण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं..विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या..