महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे घमासान पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेसाठी 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली असून भापजचे पाच तर महाविकास आघाडीचे सहा उमेदवार एकमेकांशी भिडणार आहेत. तर यावेळी आम्ही वेगळा डाव टाकणार असून, भाजपचे सर्वच उमेदवार विजयी होणार असल्याचं भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
#SharadPawar #VidhanParishad #RaosahebDanve #VishwajetKadam #NarayanRane #UddhavThackeray #VarunSardesai #MVA #BJP #HWNews