२०२४ सालच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं दोन वर्षे आधीच कंबर कसली आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप राज्यात 'मिशन 45' राबवणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज भाजपची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून, त्यापैकी ४५ जागा जिंकण्याचं भाजपचं उद्दिष्ट राहिल. त्यासाठी शिवसेनेचे खासदार असलेल्या १८ जागांवर भाजपनं आपलं लक्ष प्राधान्यानं केंद्रित केलं आहे. तसंच विविध प्रतिस्पर्धी पक्षांच्या मिळून १६ जागाही भाजपचं दुसरं लक्ष्य राहिल. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असं आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.