40 वर्षापासून पायात घुंगरू आणि ढोलकीच्या तालावर ताल धरणाऱ्या लोक कलावंतांच्या पदरी आजही निराशा. पोटासाठी तमाशा कलावंताला हातात झाडू घेऊन सफाईचे काम करण्याची वेळ आलीय. आधी कोरोना आणि नंतर सरकारी आश्वासन पूर्ण न झाल्याने तमाशा महिला कलावंत छबुबाई चव्हाण गेल्या वर्षभरापासून सफाईच्या कामातून उदरनिर्वाह करतायेत.