खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या हक्कभंग प्रकरणी राज्यातील वरिष्ठ अधिकारी आज विशेषाधिकार समितीसमोर हजर झाले. मुख्य सचिव, डीजीपी आणि मुंबईचे पोलीस
आयुक्त समितीसमोर हजर झालेत. खासदार राणा यांच्या तक्रारीवर विशेषाधिकार समितीसमोर सुनावणी सुरु आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर गैरवर्तन केल्याचा आरोप करत राणा यांनी हक्कभंगाची नोटीस दिली होती.