Mumbai High Court: हुंडा छळ प्रकरणी पतीच्या दूरच्या नातेवाईकांवरही होऊ शकतो गुन्हा दाखल

LatestLY Marathi 2022-08-18

Views 1

मुंबई उच्च न्यायालयाने हुंडा छळाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना, नातेवाइकांवरही हुंड्याचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण आदेश दिला. कलम 498A प्रकरणी एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर (FIR) रद्द करण्यास नकार देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, काही वेळा दूरचे नातेवाईकही दोन व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करतात आणि पत्नीला त्रास देतात. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, \"हेच कारण आहे की भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 498A अंतर्गत हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणांमध्ये, त्यांच्या पतीच्या नातेवाईकांवर देखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.\"

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS