सध्या महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांची एकच धांदल उडाली आहे. नेत्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्यात. जवळपास २४ वर्षांनी घेतली जाणारी ही निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्वाची आहे. येत्या १० जूनला राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. आपली मतं फुटू नये, म्हणून प्रत्येकजण खबरदारी घेतोय. त्यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरु झालंय. पक्षांनी आपल्या सगळ्या आमदारांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे. शिवसेनेनं आपल्या आमदारांना नरिमन पॉईंटच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये ठेवलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पवईमधील वेस्टिन हॉटेल मध्ये तर भाजपने कुलाबाच्या ताज हॉटेलमध्ये आपल्या आमदारांची सोय केलीये.
#RajSabhaElection #TridentHotel #TajHotel #WestinHotel
Please Like and Subscribe for More Videos.