मार्च-एप्रिल 2022 मध्ये यंदा पार पडलेली 12वी ची परीक्षा कोरोनाच्या सावटाखालीच विद्यार्थ्यांनी दिली आहे. 2 वर्षांनंतर राज्याच्या शिक्षण मंडळाकडून ऑफलाईन स्वरूपात बोर्डाचे पेपर सुरळीत पार पडले आहेत. 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रतीक्षा आहे. यंदा 12वीचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासोबतच काही थर्ड पार्टी वेबसाईटसच्या माध्यमातूनही पाहता येणार आहे.