दुकानांवर मोठ्या अक्षरांत मराठी पाट्या लावण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी मुंबईतील व्यापारी संघटनांनी केलीय. मुंबईतील व्यापारी संघटनांनी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांना पत्र लिहून ही मागणी केलीय. मोठ्या अक्षरात मराठी पाट्या लावण्यासाठी सरकारनं व्यापाऱ्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण
मान्सूनमुळे आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केलीय.