एकीकडे राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान दोन दिवसांवर आलेलं असताना तिकडे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय... सध्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात जोरदार बैठकांच्या फैरी सुरू आहेत....विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेय. काल रात्री अजित पवार आणि जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती माझाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेय.