पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. फुलांच्या शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक आरास सजावट करण्यात आलीय. शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने ही विलोभनीय दृश्य पाहायला मिळालं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभाऱ्यासह कळसावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारुन सजावट करण्यात आलीय.