पुणे शहरामध्ये एकूण 236 नाले आहेत त्यातील 170 नाले पुणे शहरातून वाहतात. त्यातील अनेक नाल्यांची सफाई झालीच नाही. नाले खोलीकरण, रुंदीकरण किंवा अतिक्रमण या गोष्टी वेळेवर होणं गरजेचं आहे. ते आजपर्यंत पुण्यात झालं नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचतं. त्याचा त्रास नागरिकांना होतो. मात्र पुणे महापालिका या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता मनसेने आपल्या' स्टाईल'नं काम करून घेण्याच ठरवलं आहे.