मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी एक पत्र ट्विट करत मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या पत्रात 'मशिदीवरील भोंग्याचा निकाल लावायचाय, कामाला लागा', असं म्हटलंय आहे. याशिवाय, त्यांनी राज्यातील सामान्य नागरिकांना उद्देशून काही सूचना आणि आवाहन केले आहे.