पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 जूनला पुण्यातील देहू नगरीत येणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान हे वारकरी संप्रदायला संबोधित करणार आहेत. त्यासाठीच्या मंडपाचं आज भूमिपूजन झालं. राम मंदिर निर्मितीचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज आणि वारकरी संप्रदायाचे कुरेकर महाराजांच्या हस्ते भूमिपूजन झालं. याचा आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.