विजय वानखेडे हे राज्य स्तरावरचे धावपटू होते. त्यांना देशासाठी खेळायचे होते. मात्र परिस्थितीमुळे त्यांना नोकरी करावी लागली. देशासाठी न खेळता आल्याची खंत मनात कायम होती. म्हणून त्यांनी गेल्या २८ वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना खेळासंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात केली. आजपर्यंत पाच हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी खेळाचं मोफत प्रशिक्षण दिलंय. पाहुयात ध्येयवेडे विजय वानखेडे यांची गोष्ट...
#buldhana #vijaywankhede #sports