प्रत्येक अभिनेत्रीला ग्लॅमरस किंवा बोल्ड कॅरॅक्टर एकदा तरी करायच असतं. पण टक्कल करून प्रेक्षकांना काय वाटेल याची पर्वा न करता केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर ती भूमिका वठवण्याची हिम्मत मोजक्याच अभिनेत्री करतात. हे मोठे शिवधनुष्य अभिनेत्री माधुरी पवार हिने लीलया पेलले आहे. तिच्या पहिल्याच 'रानबाजार' या वेबसिरीज मधून याची प्रचिती येते.