मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्वी जामीनावर आज (१९ मे) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देशपांडे आणि धुरी या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. "न्यायालयाने देशपांडे आणि धुरींना अटी-शर्तीवर दोघांचा जामीन मंजूर केले आहे. देशपांडे आणि धुरींना २३ मेपर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार असून पोलिसांना सहकार्य करावे लागणार आहे," अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
#MNS #RajThackeray #SandeepDeshpande #SessionCourt #MumbaiPolice #Loudspeaker #SantoshDhuri #HanumanChalisa #HWNews