अकोला : नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी उद्धव ठाकरे अजूनही १० वर्ष मुख्यमंत्री राहिलेत तरी ते माझ्या ८ महिन्याची बरोबरी करू शकत नाही, असं म्हटलं होतं. यावर 'रेड्याने ज्ञानेश्वरी म्हटली तसं नारायण राणेंनी सत्य ओकलं आहे. त्यामुळे खरंच नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांची सर करू शकत नाही,' असा टोला बच्चू कडू यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.