NIA टीमने गुरुवारी चार दिवसांच्या चौकशीनंतर गुंड छोटा शकील यांच्यात मनी ट्रेलचा व्यवहार आढळून आल्यानंतर गुरूवारी दोघांना अटक केली. सुत्रांच्या माहितीनुसार आरिफ अबू बकर शेख आणि शकील अबू बकर शेख उर्फ शब्बीर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मुंबईतील ओशिवरा येथील रहिवासी आहेत. त्यांच्यात महिनाभरापूर्वी हा व्यवहार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एनआयएचे पथक त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करणार आहे.