‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शालिनीचे डावपेच एकीकडे सुरु असताना गौरीदेखिल खंबीरपणे या डावपेचांचा सामना करत आहे. शालिनीच्या प्रत्येक षडयंत्रामध्ये तिची साथ देणारी सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे देवकी. देवकीशिवाय शालिनी अपूर्ण आहे. मालिकेतलं हे लोकप्रिय पात्र याआधी अभिनेत्री मीनाक्षी राठोड साकारत होती.