राज्याच्या राजकारणातील जुनी पिढी ही प्रगल्भ होती. शाळा, रुग्णालये, महाविद्यालये, रस्ते असे सामान्यांशी निगडीत प्रश्न सोडविण्याकरिता त्यांची बांधिलकी होती. आता प्राधान्यक्रम बदलला आणि अवांतर विषयांना महत्त्व आले. राज्याच्या राजकारणात थिल्लरपणा वाढला असून हे चित्र नक्कीच भूषणावह नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवादात मंगळवारी व्यक्त केली.
#Drushtianikoni #supriyasule #loksatta #girishkuber