मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची १ मे रोजी औरंगाबादेत प्रत्युत्तर सभा होणार आहे. परंतु अजूनही या सभेला पोलीस परवानगी मिळालेली नाही. या सभेला पोलीस अटीशर्तींसह परवानगी देण्याची शक्यता आहे. या सभेत धार्मिक विधानं टाळण्याची अट पोलीस राज ठाकरेंना घालू शकतात. त्यामुळे पोलिसांची ही अट राज ठाकरे मान्य करणार का? हे पाहावं लागेल. तरी, औरंगाबादेतील प्रत्युत्तर सभेची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येतेय. औरंगाबाद शहरात सगळीकडे मनसेचे झेंडे लावण्याची मनसैनिकांनी तयारी केलीय. पुण्यातही राज ठाकरेंचा हिंदूजननायक असा उल्लेख करुन मोठमोठे पोस्टर लावण्यात आलेत. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांची परवानगी मनसेच्या प्रत्युत्तर सभेला मिळते का? याकडे राज्यभरातील मनसैनिकांचं लक्ष लागलंय.
#rajthackeray, #rajthackeraynews, #aurangabad, #aurangabadnews, #mns, #mnsparty, #balanandgaokar,