Nashik News | २ वर्षांनंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात उटी वारी | Sakal Media
कोरोना संकटानंतर २ वर्षांनीं आज त्र्यंबकेश्वरमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात उटीच्या वारीचा सोहळा पार पडला. वाढत्या उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी दरवर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीला आणि मंदिरातील विठुमाऊलीच्या मूर्तीला चंदनाचा शीतल लेप लावण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. अनेक भाविक स्वतःच्या हाताने तब्बल ५० किलो चंदनाचे खोड उगाळून त्याचा लेप तयार करतात. वरुथिनी एकादशीच्या दिवशी हा लेप निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीला लावण्यात येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा लेप वारकऱ्यांना उटीचा प्रसाद म्हणून वाटला जातो. यंदा 2 वर्षानंतर हा सोहळा पार पडत असल्यानं हजारो वारकऱ्यांनी या उटीच्या वारीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी केलीय.