झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि या मालिकेच्या अफाट लोकप्रियतेमुळेच या मालिकेचं दुसरं पर्व देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी अजित आणि डिम्पल यांचा लग्नसोहळा पाहिला. पहिल्या पर्वात अजितला पोलीस इन्स्पेक्टर दिव्या सिंग लग्नाच्या मंडपातून खेचून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते.