Beed: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत एका महिलेने पाच कोटींची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात मुंबईच्या पोलिस ठाण्यात इंदूरच्या महिला विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत गेली दीड-दोन वर्षांपासून हा त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी खोटी तक्रार माझ्या विरोधात केली, ती तक्रार परत वापस घेतली. काही दिवसांपासून त्रास होतोय. तो सहन करतो अखेर शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली. अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
#beednews, #beed, #dhananjaymunde, #dhananjaymundenews,