Pune News | उन्हापासून बचाव! पुण्यातल्या पेट्रोल पंपावर नागरिकांसाठी कुलिंग फॅन | Sakal Media
गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात उन्हाचा कडाका वाढताना दिसतोय. पुण्यात तर पारा चक्क ४१ पर्यंत पोहचला असून दुपारी १२ नंतर शहरात शांतता पाहायला मिळते. उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय नागरिक करत असताना दिसतात.
याच उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पुण्यात एका पेट्रोल पंपावर अनोखी कल्पना राबवण्यात आली आहे. शहरातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर असलेल्या कर्वे पेट्रोल पंपावर चक्क नागरिकांसाठी कुलिंग फॅन बसवण्यात आले आहेत. पुणेकरांना उन्हाच्या झळ्या बसू नये तसेच उन्हातून पंपावर आल्यावर थोडा वेळ का होईना सुखकर अनुभव मिळावा यासाठी हे मोठे कुलिंग फॅन लावण्यात आले आहेत.