राज्यातील जवळपास ६७ लाख शेतकऱ्यांना २०२१-२२ मधील रब्बी व खरीप हंगामात २० हजार ५८४ कोटींचे पीककर्ज वाटप करावे, असे उद्दिष्ट राज्यस्तरीय बॅंकर्स समितीने दिले होते. परंतु ३१ मार्च २०२२ पर्यंत राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांपैकी दहा बॅंकांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केल्याची माहिती राज्य बॅंकेकडून देण्यात आली. त्यामुळे राज्यातील जवळपास सात लाख शेतकऱ्यांना विशेषत: कर्जमाफीचा लाभ घेतलेल्यांना बॅंकांकडून पीककर्ज मिळू शकले नाही.
#agrowon, #croploan, #farmloans, #farming, #farmingtips, #loanwaivescheme,