झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आणि आता हि मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत नुकतीच रेवा दीक्षित हि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि हि भूमिका साकारणारा चेहरा हा प्रेक्षकांच्या ओळखीचा आणि आवडीचा आहे. अभिनेत्री वीणा जगताप हिने रेवाच्या भूमिकेतून या मालिकेत एंट्री घेतली आहे.