एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतल्याचं उघड झालंय. जवळपास ७० ते ७५ हजार एसटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. या दोघांना या वसुलीतील किती हिस्सा मिळाला? कशाच्या आधारे ही वसुली झाली? याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे.
#stemployee, #st, #stemployee, #stemployeeprotest,#atullondhe, #sadabhaukhot, #gopichandpadalkar, #gunratnasadavarte,